अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन बलात्कार,मोबाईलमध्ये शुटिंग….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबध ठेवुन वेळोवेळी बलात्कार केला तसेच मोबाईल मध्ये त्याचे चित्रीकरण केले व ते प्रसारीत करण्याची धमकी देवुन वेळोवेळी शारिरीक संबध ठेवण्यास भाग पाडले.

यावरुन एका विरुध्द बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस रोहीत शाम भिंगारदीवे रा. राजवाडा बेलापुर याने राहत्या घरी बोलावुन प्रेम संबधाचे नाटक करुन शरीर संबध ठेवण्यास भाग पाडले तसेच

त्याचे मोबाईल मध्ये शुटिंग करुन ते व्हायरल करण्याची धमकी देवुन डिसेंबर २०२० पासुन आरोपीच्या राहते घरी तसेच इतर ठिकाणी वेळोवेळी अत्याचार केले.

या बाबतची फिर्यादीवरुन पोलीसांनी रोहीत भिंगारदीवेविरुध्द भादवि कलम ३७६,३५४ पोक्सो बाल लैंगिक अत्याचार कायदा या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24