अहमदनगर ब्रेकिंग : दिवाळीतच दरोडा ! दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking :- पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास

भावले वस्तीवर दरोडा पडला असुन दरोडेखोरांच्या मारहाणीत गोपीनाथ लक्ष्मण भावले (वय वर्षे 80) यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल,

त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले (वय वर्षे 76) यादेखील या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उपाधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी घटनास्थळी येऊन तपासाची चक्रे फिरवली.

पोलिसांची पथके याबाबत तपासबाबत गुन्हेगारांचा शोध घेत आहे. दरोड्यावेळी भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ लक्ष्मण भावले आणि शांताबाई गोपीनाथ भावले हे दोघेच होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा ऐवज चोरीला गेलेला नाही. 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office