अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- महिन्यापासून वेळेवर पिण्याचे पाणी मिळत नाही. यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील उंदिरगाव येथील विरोधी गटाच्या सदस्यांनी सरपंच सुभाष बोधक व उपसरपंच रमेश गायके व लिपिकास ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले.
ग्रामपंचायत कोणतेच काम वेळेवर पूर्ण करत नाही. केलेले काम चांगल्या दर्जाचे नाही. सार्वजनिक शौचालय ५ महिन्यांपासून बांधले तरी नागरिकांना वापरण्यास खुले केले नाही.
या मागण्यांसाठी कार्यालयास टाळे ठोकले. सरपंच बोधक व उपसरपंच गायके व लिपिक यांना ग्रामपंचायत सदस्य प्रकाश ताके, योगिता निपुंगे, दिलीप गलांडे, बाळासाहेब घोडे, अमोल नाईक, किशोर नाईक,
मनोज बोडखे, बाळासाहेब निपुंगे आदींनी कार्यालयात कोंडून घेतले. अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष सुरेश गलांडे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय उघडण्यात आले.