अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- शिर्डी येथील राजगुरू येथील साई संस्थानाचे कर्मचारी कामावरून जात असताना, अचानक चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात राजेंद्र धिवर हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला आहे. शिर्डीतील वर्दळीच्या ठिकाणी राजगुरु नगर येथील साई संस्थानाचे कर्मचारी राजेंद्र धिवर हे घरी जात असताना,
अचानक चौघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.हल्ल्यामध्ये राजेंद्र धीवर गंभीर जखमी झाले असून,
त्यानंतर त्यांना परिसरातील नागरिकांनी तातडीने शिर्डीतील सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.
नातेवाईकांनी रुग्णालय बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही,
तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नसल्याचे नातेवाईकांनी यावेळी असा निर्णय घेतला आहे. हल्ल्याचे कारण आजून देखील अस्पष्ट असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.