अहमदनगर ब्रेकिंग : नगर पुणे महामार्गावर शिवशाही बसने दोघांना चिरडले !मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नगर – पुणे महामार्गावर चास शिवारात शिवशाही बसने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारनेर तालुक्यातील दोघे जागीच ठार झाले.

अपघात इतका भिषण होता की दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याचे दिसून आले. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला.

यासंदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार राळेगणसिध्दी येथील आदर्श पतसंस्थेचे व्यवस्थापक संजय क्षीरसागर तसेच माजी सरपंच रोहिणी गाजरे यांचेे पती दादाभाऊ गाजरे हे शुक्रवारी कामानिमित्त नगर येथे गेले होते.

नगर येथील कामे आटोपून दोघेही पुन्हा राळेगणसिध्दीकडे निघाले होते. वाटेत चास शिवारातील हॉटेलमध्ये ते जेवणसाठी थांबले होते.

जेवण आटोपल्यानंतर ते पुन्हा राळेगणसिध्दीकडे परतण्याच्या तयारीत होते. नगरकडे जाणारा रस्ता ओलांडीत असताना नगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या शिवशाही बसने

त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. त्यात दोघेही दुचाकीसह फरफटत गेले. त्यात त्यांच्या शरीराची अक्षरशः छिन्न विछिन्न अवस्था झाली होती.

दुर्घटनेची माहीती समजल्यानंतर राळेगणसिध्दी तसेच पानोली येथील तरूणांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत रस्त्यावरील मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथे हालविण्यात आले तसेच रस्त्यावरील वाहने दुर करण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.

नगर येथे मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर शनिवारी दुपारी गाजरे यांच्यावर राळेगणसिध्दी येथे तर क्षीरसागर यांच्यावर पानोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्घटनेमुळे राळेगणसिध्दी तसेच पानोली गावांवर शोककळा परसली.