अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-जुन्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवारी रात्री घडली आहे.
या गोळीबारामध्ये सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय २१ वर्षे, रा. भेंडा, ता.नेवासा ) हा युवक जखमी झाला असून त्याचेवर नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नेवासा तालुक्यातील भेंडा येथील सोमनाथ तांबे मित्रांसोबत रविवार रात्री भेंडा
येथील एका मैदानावर क्रिकेट खेळत असताना रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांपैकी एकाने खेळत असलेल्या तरुणांच्या दिशेने गोळीबार केला.
त्यात चुकून गोळी लागल्याने सोमनाथ गंभीर जखमी झाला. गोळी त्याचे छातीत मधोमध लागल्याने तो थोडक्यात बचावला.
गोळीबार करून हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान हल्लेखोरांचा इतर दुसऱ्या कोणाला तरी लक्ष करावयाचे होते.
परंतु खेळता खेळता सोमनाथमध्ये आल्याने त्याला गोळी लागली असे सांगितले जाते. दरम्यान नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी तात्काळ दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.