अहमदनगर ब्रेकिंग : प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- देवस्थान जमिनीच्या वादातून दोन गट भिडले; प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर गोळीबार देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीच्या कारणातून कर्जतच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर दोन गटांत वाद होऊन प्रकरण गोळीबार करण्यापर्यंत गेले.(Ahmednagar Breaking)

सुदैवाने यात कोणाही जखमी झाले नाही. गोळीबार करणारा संदीप मांडगे याला पोलिसांनी अटक केली. भरत नामदेव मांडगे यांनी यासंबंधी फिर्याद दिली आहे.

देवस्थानची जमीन नावावर करण्यावरून झालेल्या वादामधून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथील कोकनाथ महादेव या नावाने देवस्थानमध्ये सुमारे ७५ एकर क्षेत्र आहे.

कर्जत येथील उपविभागीय दंडाधिकारी त्यांच्याकडे या जमिनीच्या वादाबाबत दावा दाखल झालेला आहे. उप विभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर संदिप छगन मांडगे, सचिन छगन मांडगे (दोन्ही रा. रेहकुरी, ता. कर्जत) हे दोघे कामकाजासाठी आले होते.

त्यावेळी दोघांत वाद झाला. संदीप मांडगे याने फिर्यादी भरत मांडगे यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाणही केली. दोघांमध्ये ही झटापट सुरू असताना संदीप मांडगे याने कंबरेचे पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला.

यामुळे धावपळ उडाली. सुदैवाने गोळी कोणालाही लागली नाही. गोळीबार केल्यानंतर संदिप मांडगे तेथून निघून गेला, असे भरत मांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office