अहमदनगर ब्रेकिंग : स्वत:च्या वडिलांची कुर्हाडीने हत्या करणाऱ्या मुलास अखेर अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :- स्वत:च्या वडिलांच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व महिन्यापासून फरार असणारा भागवत भारम भोसले ५५ रा.पढेगांव यास कोपरगाव ग्रामीण पोलीसांनी पकडले, अशी माहिती निरिक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.

२० जुलै रोली भारम हिवलदार भोसले हा घरी असतांना त्याचा मुलगा भागवत भोसले हा त्याच्या दोन मुलांसह घरी आला. आरोपीने भारम भोसले

यास विहीरीवरील पाइपलाइनचे झाकण कां उघडले याचा जाब विचारला व तिघांनी मिळून भारम भोसले यांस मारहाण केली व भागवतने त्याचे हातातील कुऱ्हाडीने भारम भोसले यांच्या डोक्यात घाव घातला.

त्यात भारम भोसले गंभीर जखमी झाले. त्यांना शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे ५ ऑगस्ट रोजी निधन झाले.

भागवत भोसले याचेवर कोपरगाव व अन्य पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. घटना घडल्यानंतर भागवत भोसले हा फरार होता.

आरोपी भागवत भोसले हा पढेगाव येथील घराजवळ असलेल्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना समजल्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक भरत नागरे, सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड,

हेड कॉन्स्टेबल इरफान शेख, अनिस शेख, अशोक काळे, अंबादास वाघ, जयदीप गवारे व फुरखान शेख आदींनी भागवत भोसले याला ताब्यात घेतले.

अहमदनगर लाईव्ह 24