अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- वडिलांजवळ अॅंड्रोईड मोबाईल घेऊन देण्याचे हट्ट धरला मात्र त्यांनी मोबाईल घेवून न दिल्याने दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली.
ही धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे.ओम दत्तात्रय वाघ (वय-१६) असे मृताचे नाव असून त्याचे मामा सुनिल म्हस्के यांच्या खबरीवरुन पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या घटनेने वाघ कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, ओम वाघ हा शहरातील भारदे विद्यालयात दहावीचे शिक्षण घेत होता.
शाळेत तो हुशार होता शिवाय तो वडीलांना व्यवसायात मदत करायचा,त्याने केवळ मोबाईलच्या हट्टापायी आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी त्याने वडिलांकडे मोबाईल घेण्यासाठी वारंवार मागणी केली होती.वडिलांनी येत्या गुढीपाडव्याला नवीन मोबाईल घेवून देण्याचे त्यास आश्वासन दिले होते.
मात्र, त्याचे समाधान न झाल्याने ओम याने बुधवारी राहत्या घरातील छताला कंबरेच्या बेल्टच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
नातेवाईकांनी त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.