अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- एका महिलेवर बलात्काराच्या गुन्ह्यात फरार व निलंबित असलेला पोलीस निरीक्षक विकास वाघ याला तोफखाना पोलिस पथकाने आज नाशिक येथे मोठ्या शिताफीने पकडले आहे.
वाघ विरोधात एका महिलेने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे, गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलिसांना आदेश दिल्या नंतर तोफखाना पोलिसांच्या विशेष पथकाने मोबाईल लोकेशन द्वारे शोध घेत नाशिक येथे वाघ याला पकडले आहे.
निलंबित असलेला वाघ हा गेल्या तीन महिन्यापासून फरार होता. तो नाशिक येथे असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज मेढे यांच्यासह त्यांच्या पथकातील हेड कॉन्स्टेबल सय्यद शकील,
अविनाश वाकचौरे, सचिन जगताप यांच्या पथकाने नाशिक येथे भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा रचून आज सकाळी त्याला पकडले. तोफखाना पोलिसांनी वाघ याला अटक केली असून न्यायालयात हजर करन्यात येणार आहे,
असे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान वाघ याला पकडायला तोफखाना पोलिसांचे पथक गेले असता, वाघ यानेच त्याच्या घरातील मौल्यवान साहित्य स्वतःच समोर फेकले.
एकप्रकारे नगरचे पोलीस माझ्या घरी चोरी करायाला आले, असा बनाव तयार केला, व आता त्याचाच आधार घेत वाघ हा तक्रार करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.