अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- एका चोवीस वर्षीय विवाहितेचा मृतदेह विहिरीत आढळला असल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे घडली आहे.
पुजा सागर मापारी असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 6 महिन्यांपूर्वीच पूजाचे लग्न झाले होते.
लग्न झाल्यापासून सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप मयत पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.
पैशाची मागणी करत तिच्यावर अनेकदा मानसिक अन् शरीरिक छळ झाल्याची तक्रारही तिच्या माहेरच्या लोकांनी केली आहे.
दरम्यान, विवाहितेने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु असतानाच तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसानी चहूबाजूंनी तपास सुरु केला आहे.
पोलिसांनी या सर्व घटनेची माहिती घेतली असून, मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे.