अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील सोपान नामेदव शिंदे ( वय ३८ वर्षे) याचा मृतदेह आढळून आला. सोपान शिंदेचा घातपात झाल्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.
सोपान शिंदे सहा दिवसांपासून बेपत्ता होते. तशी फिर्याद नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
रविवारी अकरा वाजेच्या सुमारास गावातील एक व्यक्तीला येथील तलावाच्या भागात सोपान शिंदेचा मृतदेह आढळून आला.
ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात हलवला.
परंतु, मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे शवविच्छेदन श्रीगोंदा थेते झाले नाही.त्यामुळे उच्चस्तरीय तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला आहे. सोपान शिंदेचा घातपात झाला की अन्य काही याविषयी उलटसुलट चर्चा परिसरात रंगली आहे