Ahmednagar Breaking : ओमायक्रॉन रुग्ण आढळल्यानंतर जिल्ह्यात आजपासून हे 4 निर्बंध लागू…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर जिल्हयामध्ये दैनंदिनरित्या 40-70 दरम्यान कोरोना बाधीत रुग्णसंख्या आढळून येत असल्याने दक्षिण आफिक्रा आणि इतर काही देशांमध्ये कोविड-19 विषाणूचा B.1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला असून त्यास जागतिक संघटनेव्दारे (W.H.0.) ओमायक्रॉन (Omicron) हे नाव दिलेले आहे.

सदर नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा कोविड-19 विषाणूच्या पूर्वीच्या व्हेरिएंट पेक्षा अतिशय वेगाने पसरत असल्याचे आढळून आलेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे सर्व टास्क फोर्स तसेच आरोग्य विषयक तज्ञांकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सांगोपांग

चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक
प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करणेसाठी काही ठोस उपाययोजना करणेचा निर्णय घेण्यात आला आहे.
विशेषत्वाने लसीकरण न झालेले नागरिक समूहात मिसळल्यास त्यांचे स्वतःचे आरोग्याचे दृष्टीने तसेच
आजाराच्या प्रसाराच्या दृष्टीने अधिक धोकादायक ठरू शकतात

ही बाब विचारात घेऊन सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश देताना त्यांचे लसीकरणाबाबत शहानिशा करणे अनिवार्य करून त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणेबाबत धोरण स्विकारणेस दि.24/12/2021 रोजीच्या बैठकीत सर्व संमतीने मान्यता देण्यात आलेली आहे.

त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर, साथरोग
अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा
वापर करुन अहमदनगर जिल्ह्यात खालीलप्रमाणे निर्बध दि.25/12/2021 पासून लागू करीत आहे.

1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये,
व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,
लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच
सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात “No Vaccine No Entry” याप्रमाणे निबंध लागू करीत आहे.

2) वरीलप्रमाणे प्रत्येक आस्थापना यांनी त्यांचे कार्यस्थळी येणा-या नागरिकांना कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहील. व
याशिवाय प्रवेश देणे प्रतिबंधित राहील.

3) कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन (Covid Appropriate
Behaviour) चे तसेच राज्य व केंद्र शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे
बंधनकारक राहील.

4) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क परिधान करणे, नाक व
तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे.

वरीलप्रमाणे सर्व संबंधितांनी कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड
अनुरूप वर्तन (Covid Appropriate Bahaviour) चे तसेच वरीलप्रमाणे शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील. यासंदर्भात कोणतेही उल्लंघन दिसून आल्यास शासन आदेश दि.27/11/2021 मध्ये नमूद केलेप्रमाणे शास्ती करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.