अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या नेत्याला झाली कोरोनाची लागण, म्हणाले परमेश्वर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्य व अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. अनेक राहाकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर येत आहे. 

अहमदनगर जिल्ह्यातील नेते तथा राज्याचे माजीमंत्री व जामखेड तालुक्याचे माजी आमदार राम शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 

नुकतेच त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत कोरोना Positive असल्याची माहिती दिली आहे. 

प्रा. राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणाले आहेत कि.आज माझा covid 19 अहवाल सकारत्मक (corona + ve) आला असुन डॉक्टरांनी अलगीकरनात (Isolation) थांबण्याचा सल्ला दिला आहे,माझी तब्बेत चांगली आहे, मी परमेश्वराच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होईल… – प्रा. राम शिंदे, माजी मंत्री.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24