अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- वाळूचा ट्रक सोडण्यासाठी व वाळूची वाहतूक सुरु ठेवण्यासाठी लाच मागणाऱ्या शेवगावच्या पोलीस ठाण्याच्या तीन लाचखोर पोलिसांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
यामध्ये वसंत कान्हु फुलमाळी,( पो.कॉन्स्टेबल), संदिप वसंत चव्हाण, (पो कॉन्स्टेबल), कैलास नारायण पवार(पो. कॉन्स्टेबल) यांना पकडण्यात आले आहे.
या तिघा पोलिसांनी तक्रारदार यांची वाळूचा ट्रक सोडण्यासाठी व वाळु वाहतुक सुरु ठेवण्यासाठी यांनी लाचेची मागणी केली होती.
या तिघांना पंचासमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. वरील तीनही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.