अहमदनगर ब्रेकिंग : त्या पोलिस निरिक्षकांची बदली !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची अकोले पोलीस ठाण्यातून थेट अहमदनगर नियंत्रण कक्षात आज तडकाफडकी बदली केली आहे.

त्यांच्या जागी नगर येथून सहा.पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी याबाबत काल शनिवारी आदेश काढला.

अकोलेचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांची यापूर्वी ही नियुक्ती झाल्या नंतर पोलीस कर्मचारी लाचलुचपत च्या जाळ्यात अडकला होता.

यामुळे त्यांची अहमदनगर येथे नियंत्रण कक्ष येथे काही दिवसातच बदली केली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा त्यांना अकोले पोलीस ठाण्याचा कार्यभार सोपविण्यात आला.

मात्र अलीकडेच पोलीस नाईक संदीप पांडे याला 5 हजार रुपये घेतांना पोलीस ठाण्याच्या आवाराच नगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले होते.

त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती.त्यास जबाबदार धरून परमार यांच्या तडकाफडकी बदलीचा आदेश जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांना काढावा लागल्याचे बोलले जात आहे.

तर आता परमार यांच्या जागी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांचे कडे अकोले पोलीस स्टेशनचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

आता घुगे यांचे समोर अवैध व्यवसाय बंद करण्यासह पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार कमी करण्याचे आव्हान असणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24