अहमदनगर ब्रेकिंग : अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या डॉक्टरची आत्महत्या ! सुसाईड नोट….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :-  कर्जत तालुक्यामधील मिरजगाव येथील डॉ.विश्वास कवळे यांनी इंजेक्शन टोचून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी  रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी इंजेक्शन टोचून घेवून डॉ.विश्वास अर्जुन कवळे (वय २८ ) यांनी आत्महत्या केली आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी डॉ.विश्वास कवळे यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याचे आढळून आले असून, यामध्ये आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये.

आपण आपल्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे कारण त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. डॉ.विश्वास कवळे यांनी वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर मिरजगाव येथील आपल्या राहत्या घरात आपली वैद्यकीय सेवा सुरू केली होती.

त्यांच्या पश्चात वडील शिक्षक अर्जून कवळे, आई, दोन विवाहित बहिणी आहेत. डॉ.विश्वास कवळे हा त्याच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या तरूण डॉक्टरानी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24