अहमदनगर ब्रेकिंग : सोनाराचा खून करणारे दोन आरोपी अखेर अटकेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे आढळून आलेला मृत्यूदेह हा बीड जिल्ह्यातील शिरूर कासार (ता.पाटोदा) येथील सोनाराचा असल्याचे समोर आले असून,

गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर मृत्यूदेह भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आल्याचे तपासात उघड झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत शिरूरकासार (जि.बीड) चे पोलीस निरिक्षक सिध्दार्थ माने यांनी माहिती दिली आहे की, शिरुरकासार (जि. बीड) येथील सोनार बळी विशाल कुलथे ( वय २५ ) या इसमाचा गुन्हा रजि. ६३ / २०२१ कलम ३६५ भादवि ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. ही घटना गुरुवार दि. २० रोजी घडली.

गुप्त खब-यामार्फत माहिती मिळाल्यानंतर चौकशी केली असता शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असून याच दुकानात सोनाराचा खून करण्यात आला.

या घटनेनंतर त्याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला. ते ठिकाण दाखविण्यात आले.

शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथील गट नंबर ४२९/१/१ मधील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात मृत्यूदेह खड्डा खोदून पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदीचा बहाना करून सोनार बळी विशाल कुलथे यांच्याशी संपर्क केला.

माझे लाँकडाऊनमध्ये लग्न झाले. त्यामुळे जास्त सोन करायचे आहे, असे सांगून त्याने आॅर्डर दिली होती. दुकानातील तयार असलेले सोने घेऊन माझ्या दुकानात ये असे गायकवाड म्हणाला.

सोनारानी सोने घेऊन सलून दुकानात गेला. त्याच ठिकाणी त्याचा घात झाला. शेवगाव पोलीस, शिरूर पोलीस, महसूल शेवगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला.

पोस्टमार्टमसाठी मृत्यूदेह पाठविण्यात आला. आरोपी केतन लोमटे, शिवाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर गायकवाड हा फरार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी सांगितले. पुढील तपास चालू आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24