अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकावर हल्ला करणारे दोघे जेरबंद !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात भाजपचे नगरसेवक सतीश सोनवणे व त्यांच्या भावावर त्याच्या कार्यालयात पूर्ववैमनस्यातून हल्ला करून दरोडा टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

या घटनेनेतील दोघे आरोपी शिर्डीत जेरबंद करण्यात आले. पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपायुक्त संजय बारकुंड, पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला.

नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना गुप्त खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून या गंभीर गुन्ह्यातील काही आरोपी शिर्डी परिसरातील एका हॉटेलवर असल्याचे समजले होते.

त्यावरून काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छापा टाकून शिताफीने पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी सागर सतीश देशमुख (वय ३०) व ईश्वर सुनील जगदाळे (वय २६, दोघे राहणार नाशिक) या दोघांना जेरबंद करण्यात आले.

पोलिस पथकातील कर्मचारी महेश साळुंके, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, राम बर्डे, समाधान पवार यांनी कारवाईत भाग घेतला.

शिर्डी शहर व परिसरातील हॉटेलमध्ये गुन्हेगारांचे कायम वास्तव्य असते. या अगोदरही शिर्डी शहरात बाहेरील जिल्ह्यातील पोलीस पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईची माहितीदेखील शिर्डी पोलिसांना नव्हती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24