अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनर- मोटारसायकल अपघातात दोन ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कोल्हार भगवतीपूर येथे कंटेनर व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले.

ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास काळामाळा जवळ घडली. गोरख बापूसाहेब पुरी (वय २८, रा. खुडसर, ता. राहुरी), कैलास शिवाजी पवार (४५, रा. खुडसरगाव) असे मृतांची नावे आहेत.

लोणी जवळ (काळामळा ) येथे कंटेनर (एमएच ४३, एफ ५१४४) व मोटरसायकल (एमएच १२, सीएन ४४४९) या दोन्ही वाहनांची समोरारसमाेर धडक झाली.

यात गोरख पुरी हा तरुण ठार झाला, तर पवार गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कंटेनरचालक लोणीच्या दिशेने जात असताना त्यास लोणी पोलिसांनी चालकास ताब्यात घेतले.

अहमदनगर लाईव्ह 24