अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे दोन दिवसापासून नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पॉझिटिव्ह रेट अधिक असलेल्या तालुक्यांचा दौरा करून कोरोना आढावा बैठक घेतल्या.

संगमनेर येथील शेवटच्या बैठकीत गमे यांनी तिसऱ्या लाटेला नगर पासूनच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती येऊन दहापेक्षा जास्त रुग्ण ज्या गावात आहेत ती गावे तातडीने बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रुग्ण संख्या वाढली असली तरी लसीकरणाचा वेग देखील वाढला. नगर जिल्ह्यात आतापर्यंत २३ लाख जणांचे लसीकरण झाले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत. नगर जिल्ह्यात २८ जुलैला सर्वाधिक १२०० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते.त्यानंतर १३ ऑगस्टला सर्वाधिक ११५५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते.ऑगस्ट महिन्यापासून दररोज सहाशे ते ८०० असे रुग्ण सापडत आहेत. ही संख्या दोन महिन्यापासून स्थिर आहे.मात्र, तरीदेखील ग्रामीण भागात सातत्याने रुग्णात वाढ होत आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दररोज एक लाख जणांना लस देण्याचे उद्दिष्ट दिले. सध्या १५ हजार चाचण्या असतात.त्यात दुप्पट करण्याचे सांगितले. चाचण्यांचा हा अहवाल २४ तासांच्या आत येणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

गावामध्ये दहापेक्षा जास्त रुग्ण आढळून येतील ती गावे पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. त्याच बरोबर अशा गावांमध्ये कंटेनमेंट अजून निश्चित केले जाणार आहेत. ज्या ठिकाणी एक रुग्ण त्या ठिकाणातील तीस जणांच्या तपासण्या करण्यावर भर राहणार आहे. घरी विलगीकरण पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर आम्ही बेड देखील वाढवण्यावर भर दिला. -संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी.