अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-21 व्या शतकात आजही अनेक सुशिक्षित लोक अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा, अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. याचाच फायदा घेऊन अनेक भामटे संबंधित व्यक्तीची लूट करतात.
दरम्यान नुकतेच संगमनेर तालुक्यात अंगातील भूतबाधा काढण्याच्या बहाण्याने एका भामट्या मांत्रिकाने महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (दि.१०) संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मांत्रिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मांत्रिकाला ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी कि, संबंधित विवाहिता आपल्या पतीसह नेहमी पारेगाव बु. येथे भोंदू मांत्रिक बाबा सावित्रा गडाख यांच्याकडे येत असत.
अलीकडच्या काळात संबंधित बाबा या दांपत्याला पारेगावला येताना दारूच्या बाटल्या घेऊन येण्यास सांगत असे. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र एप्रिल मध्ये संबंधित विवाहितेचे दुखणे वाढल्याने 23 एप्रिल रोजी त्यांनी बाबाला फोन करून त्याबाबत सांगितले.
त्यावर बाबाने दारूच्या बाटल्या, भेळीचा पुडा व विडीचे बंडल घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार सदरचे दाम्पत्य आपल्या मुलासह रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाबाच्या वस्तीवर पोहोचले.
त्यानंतर घरी आल्यावर हा प्रसंग विवाहितेने रडत रडत तिने पतीला सांगितला. त्यानंतर घरातील सर्वजण कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने बाहेर पडता आले नाही.
त्यामुळे सोमवारी (दि.१०) मांत्रिकाविरुद्ध तक्रार दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपी सावित्रा गडाख याला पारेगाव बुद्रुक येथील त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार अधिक तपास करीत आहेत.