अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सवंत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहात असलेल्या महिलेने आपला पती शिवनारायण नानाभाऊ सवंत्सर याचा आपल्या भावाच्या मदतीने विजेचा शॉक देऊन व नंतर दोरीने गळा आवळून खून केला.
याप्रकरणी अटक आरोपी पत्नी जयश्री व तिचा भाऊ किरण ढोणे यांना कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्यासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पत्नी जयश्री व शिवनारायण यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद होते.
दारू पिऊन जयश्रीस त्रास देत असल्याने तिने भावाच्या मदतीने पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ६ जून रोजी रात्री आरोपींनी वायरने शिवनारायण यास शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न केला.
परंतु तो न केल्याने दोरीच्या सहाय्याने त्याला गळफास लावून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. ही बाब मृताच्या वडिलांनी त्याच्या जबाबात स्पष्ट केली. अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी तपासाची चक्रे फिरवली.
संशयित मृताची पत्नी जयश्री व तिचा भाऊ ढोणे या दोघांनी शिवनारायण यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गणबोटे यांनी २२ जून रोजी दिलेल्या जबाबात मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे म्हटले.
या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्या समोर उभे केले असता न्यायालयाने आरोपींना २८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जबाबात मृत्यू हा गळा आवळून झाल्याचे म्हटले.
या आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्या समोर उभे केले असता न्यायालयाने आरोपींना २८ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.