अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- तुमचे सध्या जे चाललय ते चुकीच आहेच. तुमच्या ताब्यातील संस्था नेमके कोण चालवते ? तुमचे कारभारी लायक नाहीत . टक्केवारीच्या लोभापायी हे गुंड सांभाळता का ? हे सल्लागार बदला. तुम्ही आणलेल्या बाराशे कोटीचा हिशोब जनतेच्या दरबारात द्यावा लागेल.
मला एक लाख लोकांनी मते दिले मी त्यांचा आमदार म्हणुन तुम्हाला आव्हान करतो की जनतेच्या पैशाचा हिशोब द्या. अशी टिका आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांनी केली. पत्रकार परीषदेत ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ढाकणे म्हणाले, आज जे चाललय ते बरे नाही. बाराशे कोटी खर्च केले असते तर तालुक्याचे नंदनवन झाले असते. कोवीडसाठी एक कोटी रुपयाचा निधी आमदारांना मिळाला तो नेमके कुठे खर्च झाला ? हे जनतेचे पैसे आहेत त्याचा हिशोब जनतेला मिळाला पाहीजे ? मला एक लाख लोकांनी मते दिली मी एक लाख लोकांचा आमदार आहेच म्हणुन मला तुम्हाला विचारायचा अधिकार आहे.
पालिकेचा शहर स्वच्छतेचा मागील वर्षाचा ठेका ९६ लाखाचा होता. तो यावर्षी एक कोटी ८० लाखाला कसा दिला. मधले पैसे नेमके कोणाला मिळाले ? बाजार समितीमधे एवढा गोंधळ करुन ठेवला होता मला तर बाजार समिती ताब्यात घेवुन पश्चताप वाटला मी अजुनही तेच निस्तारतोय. पंचायत समितीमधे काय गोंधळ चाललाय तुमच्या चुकीच्या बिलाला नाही म्हणा-यांना तुम्ही कशी शिक्षा देताय.
तुमचे सल्लागार बदला. गुंडगिरी करणारे पोसु नका. त्यांचे काय उद्योग आहेत ते बाहेर काढु. कारखान्यात काय चाललेय. जिल्हा बँक बगलात आहे म्हणुन कसेही वागायचे. चोरुन साखर विकायची आणि बँकेलाही फसवायचे वेळ आली तर पुरावे देईल मी. माझ्या माणसांनी पालिकेत चुक केली तर मी राजीनामे घेतले होते. तुम्ही नेमके काय करता तुम्हाला तरी समजतंय का ?
तालुक्याच्या जडणघडणीत माधवराव नि-हाळी, बाबुजी आव्हाड, रावसाहेब म्हस्के यांच्यासह माजी मंत्री बबनराव ढाकणे व आप्पासाहेब राजळे यांचे योगदान मोठेच आहे. ढाकणेंनी बत्तीस तलाव केले. विज, शाळाखोल्या , आरोग्य सुविधा आणि इतर विकासाची कामे केली.
भगवानगड व पस्तीस गावाच्या पिण्याच्या पैठण येथील योजनेबाबत आमदार राजळेंनी केलेली घोषणा फसवी आहे . तुम्ही किती खोटे बोलणार ? आता माझ सरकार आहे ते खोटे बोलत नाही, मी भगवानगडाची योजना पुर्ण करणार आहे असे ढाकणे यांनी स्पष्ट केले.