अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी हळूहळू वाढू लागली आहे. यातच एक धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे.

जुन्या वादातून धारदार कोयत्याने वार करून एका 26 वर्षीय युवकाचा खून केल्याची खळबळजनक घटना शिर्डी शहरात घडली.

याप्रकरणी दोघांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेषबाब म्हणजे हत्या करण्यात आलेल्या आरोपींनी मुळशी पॅटर्न फिल्मी स्टाईल स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले आहे. पोलिसांनी या दोन आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शिर्डी शहरातील भीमनगर येथील रहिवासी असलेल्या अजय जगताप या युवकावर धारदार कोयत्याने वार करीत दोघांनी त्याचा खून केला. त्यानंतर दोघेही आरोपी स्वतःहून शिर्डी पोलीस स्टेशनला हजर झाले.

या हल्ल्यात मृत झालेला अजय कारभारी जगताप हा युवक तळेगाव दिघे येथील असून तो शिर्डीमध्ये भीमनगर येथे राहात होता तर आरोपी अक्षय सुधाकर थोरात, (वय 24 वर्ष रा. जवळके, ता. कोपरगाव) व रोहित बंडू खरात, रा. शिर्डी या दोघांनी मिळून शिर्डी येथे स्वतःच्या असलेल्या गाळ्यात या युवकावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला.

आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व त्यांचे सहकारी करीत आहेत.