अहमदनगर ब्रेकिंग : तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील तरूणीचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. वडजाई परिसरात शेतात राहत असलेले

संदीप सावळेराम जगदाळे यांची मुलगी पूजा (वय १७) ही महाविद्यालयीन तरूणी घरापासून काही अंतरावर असलेल्या गट नं. १८४ मधील विजय इंद्रभान जगदाळे यांच्या विहिरीत पडली.

ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु दुपारची वेळ असल्याने वेळेत मदत उपलब्ध झाली नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24