अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनेरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कंटेनरचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीवरील तरुणाचा कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली चिरडुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ही घटना राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील महावीर मार्केट समोर नगर-मनमाड रोडवर घडली. रोशन राजेंद्र गुजर (वय-३२) रा.राजगुरूनगर शिर्डी असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोशन गुजर हा आपल्या कुटुंबियांना घेऊन कोपरगावकडून शिर्डीकडे जात असताना शिर्डीनजीक असललेल्या

खड्ड्यामुळे रस्त्याच्या कडेने गव्हाचे बाचके घेऊन जाणाऱ्या कंटनेरला (क्रं.आर.जे.१४ जी.जे. २६८७) ओलांडत असताना

त्याला कंटेनरच्या दोन्ही चाकाच्या मधील भागाचा गव्हाच्या बाचक्यास धक्का लागून दोन्ही चाकाच्यामध्ये ओढला जाऊन काही क्षणात तो मागील चाकाच्या खाली सापडला.

या अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असललेल्या कंटेनर चालकास काही तरुणांनी आपल्या अन्य दुचाकी गाड्या आडव्या घालून अडविले व मात्र नागरिकांची नजर चुकवून तो झाला आहे.

दरम्यान या घटनेला नगर-मनमाड हा रस्ता नादुरुस्त झाला असून, त्यामुळे अनेकांचे बळी जात आहेत.

या प्रकरणी हा रस्ता दुरुस्त केला नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या परिसरात हा तिसरा मोठा अपघात असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb

अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24