Ahmednagar City News : सुवेंद्र गांधींनी अर्बन बँक बुडविण्याचे देखील श्रेय घ्यावे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News :आमदार संग्राम जगताप यांच्या विकास कामाचा धसका घेऊन अहमदनगर शहरातील काही स्वप्नाळु लोक सध्या उठसुठ आमदारांवर टिका करत आहेत. वास्तविक पाहता स्वतःचे राजकीय अस्तित्व संपण्याच्या स्थितीत असलेली ही मंडळी महापालिकेच्या निवडणुकीत निवडुन येऊ शकत नाही, हे सर्व शहरातील जनता जाणून आहे.

कधीकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेली ही मंडळी फक्त आमदारांचा व्यक्तिदोष या समान कार्यक्रमावर एकत्र आलेले आहेत. सुवेंद्र गांधी यांनी महापालिकेच्या जागेत त्यांच्या निवासस्थानाचे अतिक्रमण केल्याचे सर्वांना माहित आहे.

अशा व्यक्तीने रस्ते विकासाबद्दल बोलणे हास्यास्पदच असून त्यांनी ११३ वर्षांपासून भुषण असलेली नगर अर्बन बँक बंद पाडण्याच्या उंबरठ्यावर आणल्याचे पाप केले आहे. त्यांनी अर्बन बँक बुडविण्याचे श्रेय देखील घ्यावे अशी टीका माजी नगरसेवक विपुल शेटीया यांनी केली आहे..

कल्याण रोड भागातील नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेऊन तेथील सीना नदीवर उड्डाणपुल होणे ही खूप महत्त्वाची गरज होती व आमदार संग्राम जगताप यांनी सर्व पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून नुकतेच या पुलाकरिता सुमारे २४ कोटी रुपये मंजूर करुन आणले.

दि. २४/३/२०२३ रोजीच्या मंजूर कामांचा स्व. खा. दिलीप गांधी यांच्याशी संबंध कसा काय जोडले जावु शकतो याचा अभ्यास करावा. गांधी यांनी पत्रक काढून आ. जगताप यांच्यावर हास्यास्पद टिका केली असल्याचे शेटीया म्हणाले आहेत.