अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आतापर्यंत ७७७९९ रुग्ण तर चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार आठ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १६३७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५६ आणि अँटीजेन चाचणीत २८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९३, अकोले ०३, जामखेड ०२, कोपर गाव ०६, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०९, पारनेर ०९, पाथर्डी १०, राहाता ०५, शेवगाव ०५, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर ०८, कॅन्टोन्मेंट ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४९, अकोले ०४, जामखेड ०५, कोपरगाव ०८, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०२, पारनेर ०३, राहाता १८, राहुरी ०५, संगमनेर २९, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर १७ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २८ जण बाधित आढळुन आले. मनपा १०, नगर ग्रामीण ०४, पारनेर ०१, राहाता ०४, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०६ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४६, अकोले ०४, जामखेड ०२, कर्जत ०३, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०५, पारनेर १८, पाथर्डी ०४, राहाता २०, राहुरी ०२, संगमनेर २७, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर १४, कॅन्टोन्मेंट ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७५००८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १६३७
  • मृत्यू:११५४
  • एकूण रूग्ण संख्या:७७७९९
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24