अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- आज १७६ रूग्णांना डिस्चार्ज तर २१५ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर अहमदनगर: जिल्ह्यात आज १७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार १०० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८२ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२८८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १५२ आणि अँटीजेन चाचणीत १७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८, अकोले १४, कोपरगाव ०१, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी ०१, राहाता ०६, संगमनेर ०३, कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४१, अकोले ०७, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपर गाव १०, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०४, पाथर्डी ०२, राहाता २१, राहुरी ०५, संगमनेर २८, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०९, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नेवासा ०१, पारनेर ०२, राहाता ०२, राहुरी ०२, इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ५४, अकोले ०५, कर्जत ०३, कोपरगाव १७,, नगर ग्रामीण १०, नेवासा ०१, पारनेर १०, पाथर्डी ०५, राहाता १०, राहुरी ०७, संगमनेर ३१, शेवगाव ०९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)