अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६ हजार ५८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८९ आणि अँटीजेन चाचणीत १८६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ०२, जामखेड ०६, नगर ग्रामीण ०२, पाथर्डी ०१, संगमनेर १०, शेवगाव २०, श्रीगोंदा ०१ आणि श्रीरामपूर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, अकोले ०५, जामखेड २६, कर्जत १४, कोपरगाव ०१, नगर ग्रा.०९, नेवासा ३२, पारनेर २४, पाथर्डी १७, राहाता ०८, राहुरी १०, संगमनेर ३७, शेवगाव ३१, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर १९, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १८६ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ०६, जामखेड ०९, कर्जत २०, कोपरगाव ०४, नगर ग्रा. ०४, नेवासा १७, पारनेर ३४, पाथर्डी १९, राहाता ०९, राहुरी ०८, संगमनेर २१, शेवगाव १५, श्रीगोंदा ०७ आणि श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४४, अकोले ५३, जामखेड ४९, कर्जत २५, कोपरगाव २२, नगर ग्रामीण ५९, नेवासा ८१, पारनेर ५९, पाथर्डी ३६, राहाता ३६, राहुरी ३८, संगमनेर १३७, शेवगाव ७८, श्रीगोंदा ५२, श्रीरामपूर ७०, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा १० आणि इतर राज्य ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:२,५८,९५८
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:६०५८
  • मृत्यू:३५१३
  • एकूण रूग्ण संख्या:२,६८,५२९

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24