अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोना होतोय कमी… आज कमी झाले येवढे रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवस दररोज तीन हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत होते.

मात्र आज गेल्या २४ तासात ही आकडेवारी तीन हजारपेक्षा कमी आली आहे. सलग तीन दिवस तीन हजारांहून अधिक नवीन रुग्णांची संख्या नोंदवली गेली होती.

मात्र आज कोरोना रुग्णांची संख्या ही तीन हजारांहून कमी नोंदवली गेली आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात २ हजार ७९५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये अहमदनगर शहर ६५०, राहाता २१६,

संगमनेर १३९, श्रीरामपूर २२९, नेवासे १८४, नगर तालुका २८२, पाथर्डी ९४, अकाेले ९०, काेपरगाव ११५, कर्जत १६०, पारनेर १४५,

राहुरी १५८, भिंगार शहर २१, शेवगाव १०८, जामखेड २७, श्रीगाेंदे १०५, इतर जिल्ह्यातील ७१ आणि इतर राज्यातील १ जणांचा समावेश आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24