पुन्हा राज्यात वाढतोय कोरोना अहमदनगर मध्ये कशी आहे परिस्थिती ? वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ३०२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ७९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.३३ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८५५ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६ आणि अँटीजेन चाचणीत ०९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९, कोपर गाव ०१, नगर ग्रामीण ०५, संगमनेर ०३, शेवगाव ०१ , इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण ०५, पारनेर ०१, राहता ०३, राहुरी ०१,

शेवगाव ०२ श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ०९ जण बाधित आढळुन आले. मनपा ०३, नगर ग्रामीण ०३, राहाता ०२,

राहुरी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १०१, अकोले १५, जामखेड ०४, कर्जत १४, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ३६,

नेवासा १०, पारनेर १२, पाथर्डी ०६, राहाता १२, राहुरी ०३, संगमनेर २१, शेवगाव १०, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर १३, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:७१७९४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ८५५
  • मृत्यू:१११६
  • एकूण रूग्ण संख्या:७३७६५
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
  • © Copyright 2021, all rights reserved
अहमदनगर लाईव्ह 24