अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ४७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८० हजार ३६९ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.०५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८५७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३८९७ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३१९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४७५ आणि अँटीजेन चाचणीत ६३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२४, अकोले ०५, जामखेड ०५, कर्जत १२, कोपर गाव ४५, नगर ग्रामीण १४, नेवासा ०१, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता ४०, राहुरी ०५, संगमनेर १८, शेवगाव १०, श्रीरामपूर १५, कॅन्टोन्मेंट १०, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६६, अकोले ०९, कर्जत ०६, कोपरगाव ३१, नगर ग्रामीण १९, नेवासा १७, पारनेर १०, पाथर्डी ०६, राहाता ६९, राहुरी २१, संगमनेर ६४, शेवगाव ०५, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट ०५ इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ६३ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, जामखेड ३२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०९, पाथर्डी १०, राहाता ०२, संगमनेर ०२, श्रीरामपूर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १६१, अकोले १०, जामखेड ११, कर्जत ०५, कोपर गाव १६, नगर ग्रामीण १८, नेवासा १५, पारनेर ११, पाथर्डी ०७, राहाता ७७, राहुरी २१, संगमनेर ४३, शेवगाव ४१, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर २१ , कॅन्टोन्मेंट ०५ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)