अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ४५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८१ हजार ४३६ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५९९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१२१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९० आणि अँटीजेन चाचणीत १५८ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१, नगर ग्रामीण ०१, पाथर्डी ०३, श्रीरामपूर १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२८, अकोले ०४, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव १९, नगर ग्रामीण १०, नेवासा १७, पारनेर ०९, पाथर्डी ०६, राहाता ५३, राहुरी १६, संगमनेर २८, शेवगाव ११, श्रीरामपूर ६१, कॅन्टोन्मेंट ०३ इतर जिल्हा १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १५८ जण बाधित आढळुन आले. मनपा २७,अकोले ०२, कर्जत १५, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण १०, नेवासा ०५, पारनेर ०४, पाथर्डी २५, राहाता १९, राहुरी १७, संगमनेर ०१, शेवगाव १८, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०६, कॅन्टोन्मेंट ०१, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १२४, अकोले ०५, जामखेड ०६, कर्जत ११, कोपर गाव ७४, नगर ग्रामीण १९, नेवासा १७, पारनेर २५, पाथर्डी १२, राहाता ४९, राहुरी १५, संगमनेर १५, शेवगाव १३, श्रीगोंदा १५, श्रीरामपूर ५३, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:८१४३६
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:४१२१
  • मृत्यू:११८९
  • एकूण रूग्ण संख्या:८६७४६
  • (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24