अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७९६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४५ हजार ०४२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.३३ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १५८८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ११ हजार ६२९ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४७९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३० आणि अँटीजेन चाचणीत ५७९ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०५, अकोले ६२, जामखेड ४५, कर्जत ०९, नगर ग्रामीण ५५, नेवासा ०३, पारनेर २९, पाथर्डी ०७, राहता १७, राहुरी ०९, संगमनेर १४, शेवगाव ११०, श्रीगोंदा ६५, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५०, अकोले १३, जामखेड ५०, कर्जत ०७, कोपरगाव १२, नगर ग्रा.३८, नेवासा १९, पारनेर ४१, पाथर्डी ०७, राहाता २०, राहुरी ६३, संगमनेर ६३, शेवगाव ४७, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ८०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०३ आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ५७९ जण बाधित आढळुन आले. मनपा १४, अकोले ५१, जामखेड १४, कर्जत ३३, कोपरगाव ५५, नगर ग्रा. ४१, नेवासा २१, पारनेर ७२, पाथर्डी ६५, राहाता ३०, राहुरी ३८, संगमनेर ४०, शेवगाव २५, श्रीगोंदा २३, श्रीरामपूर ५४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ९१, अकोले २०१, जामखेड २३, कर्जत ९०, कोपरगाव ६८, नगर ग्रामीण ९५, नेवासा ९२, पारनेर ११५, पाथर्डी ११३, राहाता ८१, राहुरी १८५, संगमनेर ३५४, शेवगाव ४६, श्रीगोंदा ७३, श्रीरामपूर १४६, कॅन्टोन्मेंट ०१, इतर जिल्हा २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)