अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २६३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १९ हजार २४१ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७९५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१ हजार २७७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६०८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६९१ आणि अँटीजेन चाचणीत १४९६ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १८२, अकोले ०१, जामखेड ०१, कर्जत ७९, कोपरगाव ३३, नगर ग्रामीण २०, नेवासा १४, पारनेर ४३, पाथर्डी ०३, राहाता १३, राहुरी ०६, संगमनेर ८८, शेवगाव ३३, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ८२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०८ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३०, अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत १३, कोपरगाव ३४, नगर ग्रामीण ६७, नेवासा १८, पारनेर २६, पाथर्डी १२, राहाता ७६, राहुरी २९, संगमनेर २७, शेवगाव १८, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर ५३, कॅंटोन्मेंट बोर्ड ०४ आणि इतर जिल्हा जिल्हा ५९ आणि इतर राज्य ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १४९६ जण बाधित आढळुन आले. मनपा २३८, अकोले ८७, जामखेड २५, कर्जत ६८, कोपरगाव ४८, नगर ग्रामीण १९५, नेवासा १५२, पारनेर ७६, पाथर्डी ७९, राहाता १२७, राहुरी १२३, संगमनेर २४, शेवगाव ५७ श्रीगोंदा ८३, श्रीरामपूर ९४, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०९ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४६६, अकोले १४३, जामखेड ३२, कर्जत १६२, कोपरगाव २९३, नगर ग्रामीण १०४, नेवासा ११२, पारनेर ११८, पाथर्डी ११४, राहाता २१२, राहुरी १५०, संगमनेर २१९, शेवगाव ९१, श्रीगोंदा १२४, श्रीरामपूर २००, कॅन्टोन्मेंट ७१, मिलिटरी हॉस्पिटल ०७ आणि इतर जिल्हा १३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:१,१९,२४१
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२१२७७
  • मृत्यू:१६३५
  • एकूण रूग्ण संख्या:१,४२,१५३
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24