अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ७९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ७९१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३३०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८७ आणि अँटीजेन चाचणीत २८४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये अकोले ०८, जामखेड २८, कर्जत ०७, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर ९५, पाथर्डी ४१, राहुरी ०१, संगमनेर ४५, शेवगाव ०३, श्रीगोंदा ८८ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, अकोले ११, कर्जत ०४, कोपरगाव १७, नगर ग्रा.१४, नेवासा १७, पारनेर ०८, पाथर्डी ०१, राहाता ४०, राहुरी २२, संगमनेर ८२, शेवगाव ३३, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ११, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २८४ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले ४१, जामखेड ०३, कर्जत ०२, कोपरगाव ०५, नगर ग्रा. ०९, नेवासा ११, पारनेर ३३, पाथर्डी ३८, राहाता ०६, राहुरी ११, संगमनेर ८२, शेवगाव ०१, श्रीगोंदा ३३, श्रीरामपुर ०७ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले ६४, जामखेड ०९, कर्जत ५४, कोपरगाव १९, नगर ग्रा. ४४, नेवासा ५५, पारनेर ८२, पाथर्डी ३४, राहाता ४८, राहुरी ३३, संगमनेर ११४, शेवगाव ३२, श्रीगोंदा ३३, श्रीरामपूर २१ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)