अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८११ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २० हजार ५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३२ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७७६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६०५ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६१ आणि अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, जामखेड ०६, नगर ग्रामीण १०, पारनेर ५३, पाथर्डी ०१, राहुरी ०३, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ५५, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ९२, जामखेड ०२, कर्जत १३, कोपरगाव १२, नगर ग्रा.११, नेवासा ३३, पारनेर ११, पाथर्डी ०१, राहाता ४०, राहुरी १०, संगमनेर ६४, शेवगाव ३०, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर १५ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज २६० जण बाधित आढळुन आले. मनपा ०४, अकोले ४५, जामखेड ०४, कर्जत २१, कोपरगाव ०६, नगर ग्रा. ०६, नेवासा २६, पारनेर १४, पाथर्डी २४, राहाता ०९, राहुरी ०८, संगमनेर ५०, शेवगाव १९, श्रीगोंदा ०९, श्रीरामपुर ०५ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३३, अकोले ७९, जामखेड २१, कर्जत २०, कोपरगाव २५, नगर ग्रा. ३०, नेवासा २३, पारनेर ४९, पाथर्डी ६५, राहाता ५४, राहुरी ४२, संगमनेर २५०, शेवगाव ५८, श्रीगोंदा ३४, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,२०,०५६
उपचार सुरू असलेले रूग्ण:५६०५
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६६३७
एकूण रूग्ण संख्या:३,३२,२९८
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)