file photo

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १९ हजार २४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३० टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७८३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६४२ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३६ आणि अँटीजेन चाचणीत २७२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, जामखेड ०३, नगर ग्रामीण ०९, पारनेर २०, पाथर्डी १७, राहुरी ०१, संगमनेर ६९, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०७, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९, अकोले १३, जामखेड ०४, कर्जत १४, कोपरगाव २५, नगर ग्रा.११, नेवासा ३४, पारनेर २२, पाथर्डी ०८, राहाता ४१, राहुरी २७, संगमनेर ६१, शेवगाव २६, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १८ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७२ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, अकोले ६५, जामखेड ०५, कर्जत २७, कोपरगाव ०८, नगर ग्रा. ०७, नेवासा ०९, पारनेर २३, पाथर्डी १७, राहाता ०५, राहुरी ५३, संगमनेर २६, शेवगाव ०१, श्रीगोंदा १६ आणि श्रीरामपुर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २३, अकोले ७८, जामखेड २७, कर्जत १७, कोपरगाव १५, नगर ग्रा. ४१, नेवासा ४६, पारनेर ८४, पाथर्डी ४२, राहाता ३७, राहुरी ३३, संगमनेर १२८, शेवगाव ४६, श्रीगोंदा ८९, श्रीरामपूर २०, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:३,१९,२४५

उपचार सुरू असलेले रूग्ण:५६४२

पोर्टलवरील मृत्यू नोंद:६६३५

एकूण रूग्ण संख्या:३,३१,५२२

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)