अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८८ हजार ९९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०३ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ७४१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३३४ आणि अँटीजेन चाचणीत ३०७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०१, अकोले १५, नगर ग्रा. १५, पारनेर ७३, पाथर्डी ३३, राहुरी ०२, संगमनेर १४, शेवगाव ०२ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७, अकोले ०६, जामखेड ०३, कर्जत ३६, कोपरगाव १० नगर ग्रा.२०, नेवासा १८, पारनेर ११, पाथर्डी ०६, राहता ०३, राहुरी १२, संगमनेर ९३, शेवगाव ६६, श्रीगोंदा ०६, श्रीरामपूर १७ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३०७ जण बाधित आढळुन आले. मनपा ०५, अकोले २३, जामखेड ०८, कर्जत ३१, कोपरगाव ०२, नगर ग्रा. ३१, नेवासा ४४, पारनेर ३३, पाथर्डी १५, राहता ०२, राहुरी १०, संगमनेर १९, शेवगाव २३, श्रीगोंदा ४३ आणि श्रीरामपूर १८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २१, अकोले ११, जामखेड २१, कर्जत १६, कोपरगाव १६, नगर ग्रा. २०, नेवासा १३, पारनेर १७, पाथर्डी १४, राहता २१, राहुरी २३, संगमनेर २२, शेवगाव २६, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १३ आणि इतर जिल्हा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:२,८८,९९९
उपचार सुरू असलेले रूग्ण:५७४१
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६२१३
एकूण रूग्ण संख्या:३,००,९५३
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)