अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९ हजार ८९४ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५१८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४१६ आणि अँटीजेन चाचणीत ११६ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२१, अकोले ०१, जामखेड ०६, नगर ग्रामीण ११, नेवासा १०, पारनेर २०, पाथर्डी ०१, राहाता ०६, संगमनेर १७, श्रीगोंदा २५, श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९५, अकोले ०९, जामखेड ०४, कर्जत ०३, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण १५, नेवासा ११, पारनेर ०७, पाथर्डी १०, राहाता ७९, राहुरी १०, संगमनेर ५४, शेवगाव १२, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर २६, इतर जिल्हा १९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ११६ जण बाधित आढळुन आले. मनपा ३४, जामखेड १८, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०४, पारनेर ०९, पाथर्डी २२, राहाता ०९, राहुरी ०१, शेवगाव ०२,श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०५ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २२९, अकोले २७, जामखेड २४, कर्जत ०३, कोपर गाव ५०, नगर ग्रामीण १४, नेवासा १५, पारनेर १५, पाथर्डी ०८, राहाता ३९, राहुरी १४, संगमनेर ५५, शेवगाव २१, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २७ , कॅन्टोन्मेंट ०८ आणि इतर जिल्हा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)