अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ५९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८५ हजार ६५२ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ११०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ६३८५ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३३२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९५ आणि अँटीजेन चाचणीत ३७३ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९०, अकोले ११, जामखेड ४०, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १५, नेवासा ०६, पारनेर ०१, पाथर्डी ०७, राहता २७, राहुरी ०४, संगमनेर १७, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ०२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १५६, अकोले ११, जामखेड ०१, कर्जत ०४, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ३०, नेवासा ०६, पारनेर ०९, पाथर्डी ०६, राहाता ३४, राहुरी १६, संगमनेर ४१, शेवगाव १०, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ४७, कॅंटोन्मेंट ०७ आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३७३ जण बाधित आढळुन आले. मनपा ५३, अकोले २३, जामखेड ३०, कर्जत ६८, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण १८, नेवासा १२, पारनेर ११, पाथर्डी १४, राहाता ३२, राहुरी ४५, संगमनेर १४, शेवगाव ०५, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर २९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८६, अकोले ०६, जामखेड ०५, कर्जत २०, कोपरगाव २१, नगर ग्रामीण २१, नेवासा २२, पारनेर १३, पाथर्डी ३४, राहाता ७२, राहुरी ३३, संगमनेर २९, शेवगाव २९, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर ८३, कॅन्टोन्मेंट ०४ आणि इतर जिल्हा १७ अशा रुग्णांचा समावेश आहे.