अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- लग्नास नकार दिल्याने शहरातील एका १८ वर्षीय युवतीने शुक्रवारी घरी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र ती बचावली. रविवारी ती शुद्धीवर आली.
तिच्या जबाबावरुन अरबाज पठाण (अकोले नाका) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन शहर पोलिसांनी अटक केली.युवती व अरबाज पठाण यांची ओळख होती.
ओळखीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. युवतीने आपण अगोदर लग्न करु, नंतर संबंध ठेवू असे सांगून देखील पठाणने गोड बोलून तीन वर्षांपासून तिचे इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तदनंतर लग्नासाठी विचारणा केली असता, अंतरजाती विवाहासाठी घरातील लोक तयार होत नसल्याचे सांगून त्याने लग्नास नकार दिला.
या धक्क्याने युवतीने विषारी औषध प्रश्न केले. तिच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या शर्तीने तिचे प्राण वाचविले.
रविवारी ती शुद्धीवर येताच पोलिसांनी तिचा जबाब घेतला. अरबाज पठाण याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक योगिता कोकाटे करीत आहेत.