अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून जेरबंद केला आहे.

मंगळवारी सकाळी पुणे बस स्थानक अहमदनगर येथुन पलायन करण्याच्या बेतात असलेला आरोपी नामदेव मामा या वेटरकाम करणाऱ्या आरोपीस एलसीबीने ताब्यात घेतले आहे. राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत हॉटेलमध्ये साक्षी झोपलेल्या सोनू नामदेव छत्री (वय २७, रा. जोडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) याची हत्या झाल्याची घटना घडली होती.

त्याच्या सोबत असणारा दुसरा वेटर नामदेव केशव दराडे (वय ३०, रा. बोधेगाव, ता. शेवगांव) हा घटना घडल्यापासून फरार होता या फरार वेटरवर पोलिसांचा संशय होता त्याच्या शोधार्थ पोलिसांनी पथके रवाना केली होती.

त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील रवाना झालं होतं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अहमदनगर येथून ताब्यात घेतला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सोमनाथ दिवटे ,गणेश इंगळे, सोपान गोरे,मनोहर गोसावी, विश्वास बेरड,दत्तात्रेय इंगळे, सुनील चव्हाण, दीपक शिंदे,शंकर चौधरी,रवी सोनटक्के,सागर ससाने,शिवाजी ढाकणे,

रवींद्र घुंगासे ,रवींद्र गायकवाड, रोहित यमुल, विनोद मासाळकर, मच्छिंद्र बर्डे आदिंच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.