अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. नगर शहरामध्ये अठरा रुग्णालयांमध्ये सुमारे 102 रुग्ण सध्या उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या दोन दिवसांमध्ये ही संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रुग्णसंख्या झपाट्याने वाढली :- कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर आता या आजाराची लक्षणे वाढत चालल्यामुळे नगर शहरामध्ये चार दिवसापूर्वी 40 रुग्ण होते आता त्यानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आता तो आकडा 102 च्या घरामध्ये गेलेला आहे या आजारामुळे एक जणाचा नगर शहरामध्ये मृत्यू ही झाला आहे.
बरे झालेल्या रुग्णांना भीती :- कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे ही आता मोठ्या प्रमाणात जाणवू लागलेली आहे, नगर शहरामध्ये 102 रुग्ण शहरातील अशा विविध खासगी रुग्णालयांमध्ये सध्या उपचार घेत आहे.
नाक, डोळे गमावण्याची वेळ :- राज्यातही काही ठिकाणी अश्या रुग्णांची परिस्थिती अतिशय भयानक अशी होत चाललेली आहे ,काहीना नाक, डोळे गमावण्याची वेळ आली आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत गेली तर त्यांच्यावर तात्काळ इलाज कशा पद्धतीने होईल यासाठी आता विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.
इंजेक्शन तात्काळ मिळावे :- म्युकरमायकोसिस या रुग्णांना नगरच्या जिल्हा रुग्णालयातून इंजेक्शन उपलब्ध करून दिले जात आहे ,मात्र त्यांची संख्या अतिशय नगण्य असल्यामुळे इंजेक्शन तात्काळ मिळावे अशी मागणीसुद्धा आता मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे.
इंजेक्शनची मागणी वाढली :– रुग्णाच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय बाहेर जाऊन त्यासाठी उभे राहावे लागत आहे. जेवढा साठा आहे तेवढ्या पद्धतीने सध्या इंजेक्शन दिले जात आहे मात्र आता रुग्ण संख्या वाढत चालल्यामुळे इंजेक्शनची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली आहे
वेळीच उपचार आवश्यक : सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी होतो.
प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा :- दरम्यान म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना, प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व मुख्य सचिवांना आणि प्रशासकांना पत्र लिहिलं आहे.
रुग्णालय संसर्ग नियंत्रण समिती स्थापन करून संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी सूचना राज्यांना करण्यात आली आहे. राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकार कडून सर्व प्रकारचं साह्य मिळेल, असं आश्वासनही मंत्रालयानं दिलं आहे.