अहमदनगर जिल्ह्या हादरला : अकरा वर्षीय मुलाची हत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :- शेवगाव तालुक्यातील खुंटेफळ येथे ११ वर्षीय मुलाची हत्या झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. हत्या झालेल्या मुलाचे नाव सार्थक आंबादास शेळके असे आहे.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराशेजारी काम करत असताना घरी मोबाइल आणण्यासाठी गेलेल्या सार्थकच्या मानेवर धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेने शेवगाव तालुका हादरला आहे.

या बालकाची हत्या कोणी व कोणत्या कारणाने केली, याचा तपास लावण्याचे आव्हान शेवगाव पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. खुंटेफळ येथील अंबादास शेळके हे सोमवारी दुपारी आपल्या कुटुंबासमवेत घराशेजारी असलेल्या वाडग्यात काम करत होते.

या दरम्यान सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान आंबादास यांनी मुलगा सार्थक याला घरामध्ये असलेला मोबाईल घेऊन घेण्याचे सांगितले. वडिलांनी मोबाईल आणण्याचे सांगितल्याने सार्थक घरात गेला.

बराच वेळ झाला तरी सार्थक का आला नाही, हे पाहण्यासाठी शेळके गेले असता सार्थक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना दिसला.

सार्थकच्या मानेवर धारदार शस्त्राने कोणीतरी वार केलेले होते. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान घडली.

घटनेची माहिती कळताच शेवगाव पोलिस ठाण्याचे प्रभाकर पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली.

याप्रकरणी मयताचे वडील अंबादास शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24