अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात ऊस तोडणी कामगाराच्या बेपत्ता झालेल्या साडेचार वर्ष वय असलेल्या मुलीवर अत्याचार करून खून झाल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवताच मुलीच्या बापानेच अत्त्याचार करुन तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले असून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्राम्हणी-जुना वांबोरी रोड रस्त्यालगत ऊस तोडणी कामगाराचा अड्डा आहे. त्यापासून एक हजार मीटर अंतरावरील विहिरीमध्ये काल मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये सदर पीडित मुलीवर अत्त्याचार करून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुलगी ऊस तोडणी कामगारांच्या झोपडीतून बेपत्ता होती. शनिवारी कुटुंबीयांनी दिवसभर तपास केला. शोध लागला नव्हता. अखेर शनिवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता.
श्रीरामपूर विभागाचे डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक गणेश शेळके आदींनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.तेव्हा मुलीच्या बापानेच अत्त्याचार करुण तिचा खून केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी आरोपी बापावर राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.नं १४४/२०२१ नुसार भा.द.वि. कलम ३०२, ३७७, २०१, १७७ सह पोस्को ४ व ६ प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक गणेश किसन शेळके यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस अटकही केली आहे.
यातील आरोपी हा त्याचे पत्नीस मुलीला गावात घेवून जातो असे सांगून घेवून गेला. तिचेवर अनैसर्गिक संभोग करुन तिस त्याचे राहते झोपडीपासून अंदाजे १५० मीटर अंतरावर असणाऱ्या ब्राम्हणी शिवारातील शेती गट क्र. २५३ मधील ओढयालगत असलेल्या विहीरीच्या पाण्यात टाकून ठार मारले.
सदर केलेल्या अपराधाचा पुरावा नाहीसा करण्या करीता मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने झोपेत असताना पळवून नेले वगैरे मजकुराची खोटी फिर्याद वरून त्यानेच पोलिसांना दिली होती.पो. नि. हनुमंतराव गाडे यांच्यासह तपास पथकाला फिर्यादी बापावरच संशय आला.पोलिसांनी त्याबाजूने तपास करत नराधम बापाचा भांडाफोड केला.