अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- ज्या महिलेने दोन तरुणांना रोजगार दिला. त्यांनीच या महिलेची अवघ्या काही सोन्याच्या दागिन्यासाठी हत्या केल्याचे धक्कादायक घटना उघड झाली आहे.
हा प्रकार अकोले तालुक्यातील आंभोळ येथे शुक्रवार दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी पहाटेच्या सुमारास घडली. जेव्हा ही महिला मयत झाल्याचे लक्षात आले तेव्हा पोलिसांना माहिती कळविली असता हा अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचे वैद्यकीय अहवालातून निष्पन्न झाले आहे.
त्यामुळे, याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रीयाने नोंद करण्यात आली असून एकास अकोले पोलिसांनी तर दुसर्या व्यक्तींस राजूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यात कांताबाई तुकाराम जगधने (रा. आंभोळ, ता. अकोले) असे मयत महिलेचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांताबाई जगधने ही महिला आंभोळ परिसरात वास्तव्यस होती. तीने एका व्यक्तीस घरावरची कौले बसविण्याची विनंती केली होती. आता ज्याला रोजगार दिला होता. त्याने आजीचे घर शेकारले खरे. मात्र, तेव्हापासूनच त्याची नजर तिच्या गळ्यात असलेल्या फुटक्या मन्यांवर पडली होती.
त्याने कौले बसविल्यानंतर आजीकडून त्याला शंभर रुपये घेणे बाकी होते. आता हे जे दोघे ताब्यात घेतले आहेत. ते आजीच्या घरापासून रहायला काही फार दुर नव्हते. आजी एकटी असल्याची यांनी पुर्णत: माहिती होती. त्यामुळे, त्यांनी सायंकाळी कोतुळ येथे मद्य प्रशन केले.
त्यानंतर आणखी मद्य प्राषण करण्यासाठी हे रात्री आजीच्या घरी गेल्याचे बोलले जाते. तेथे त्यांनी आजीकडून दारुत ओतण्यासाठी पाणी मागितले आणि जेव्हा यांनी ढोसल्यानंतर यांची नजर आजीच्या गळ्यावर गेली आणि अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी आजीची हत्या केली व दोघेही तेथून चालते झाले.
म्हणजे, ज्यांना विश्वासातले म्हणून निवारा दिला. त्यांनीच आजीच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिची हत्या केली. तालुक्यात अशी घटना पहिल्यांदाच घडना घडली आहे आणि आता तर चोरट्यांनी थेट खूनच केला आहे. त्यामुळे, दहशत माजविणार्यांना पोलिसांनी गाजाआड करावे अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.