ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शनिवार, दिनांक 17 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शनिवारी सकाळी 8.15 वाजता जुहू विमानतळ येथून खाजगी विमानाने शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय मोटारीने कोविड केअर सेंटर व 250 बेड्स च्या कोविड हेल्थ केअर सेंटरकडे प्रयाण व पाहणी.

सकाळी 10 ते 10-45 राहाता तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक.( स्थळ -श्री साईबाबा हॉस्पीटल हॉल, शिर्डी. सकाळी 10-45 वाजता शिर्डी येथून शासकीय मोटारीने कोपरगावकडे प्रयाण.

सकाळी 11 वाजता कोविड केअर सेंटर, एसएसजीएम कॉलेज कोपरगाव येथे आगमन व पाहणी. सकाळी 11.15 वाजता महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथील 300 बेड्स कोविड सेंटरची पाहणी.

सकाळी 11-30 ते 12-30 कोपरगाव तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना, लसीकरणाबाबत आढावा बैठक (स्थळ- कृष्णाई मंगल कार्यालय, कोपरगाव.) दुपारी 12-30 वाजता कोपरगाव येथून मोटारीने शासकीय विश्रामगृह अहमदनगरकडे प्रयाण.

दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह अहमदनगर येथे आगमन व राखीव. दुपारी 3 ते 4 वा. अहमदनगर जिल्हयातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा, लसीकरण व त्यावरील उपाययोजना याबाबत आढावा बैठक.

स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. दुपारी 4 ते 4-45 वाजता पत्रकार परिषद. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर. सायंकाळी 4-45 वाजता अहमदनगर येथून मोटारीने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण.

सायंकाळी 5-45 वाजता शिर्डी विमानतळ येथे आगमन. सायंकाळी 6 वाजता खाजगी विमानाने शिर्डी येथून बेळगाव (कर्नाटक) विमानतळाकडे प्रयाण. ***

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24